मोताळा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनास जालिंदर बुधवत यांची भेट.
लोणार Live / पंढरीनाथ डोईफोडे
गेल्या काही दिवसापासून राज्यात विविध भागात अंगणवाडी सेविकांचे त्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. आज दिनांक ११/१/२४ रोजी मोताळा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनास जालिंदर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख बुलडाणा यांनी भेट दिली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळणे, मानधनात वाढ मिळावी, निवृत्तीनंतर मासिक भत्ता मिळावा यासह इत्यादी मागण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास बुलडाणा जिल्हा शिवसेनेचा (उ बा ठा) पक्षचा पाठिंबा असल्याचे यावेळी जालिंदर बुधवत यांनी सांगितले.
यावेळी महाविकास आघाडीतील सहकारी गणेश राजपुत, प्रशांत वाघोदे, उप जिल्हाप्रमुख सुनील घाटे, गजानन मामलकर, राजु बोरसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.