♻️ उल्कानगरी लोणार येथे रंगली सांज पाडव्याची मैफल;कार्यक्रमाला अनेक जेष्ठ नागरिक व संगीत प्रेमींची उपस्थिती
लोणार लाईव्ह वृत्त : पंढरीनाथ डोईफोडे
दीपावली निमित्त लोणारच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘मी लोणारकर’ टीम , मैत्री कट्टा व निसर्ग फाउंडेशनच्या वतीने “सांज पाडवा” या गीतगायन कार्यक्रमाचे आयोजन लोणार येथे करण्यात आले. लोणार वासियानी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचा मोठ्या संखेने येऊन आनंद लुटला. श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे सायंकाळी हा कार्यक्रम घेण्यात आला ‘स्वरकुंज’ संगीत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अनिल सोनूने (उकळीकर) वाशीम व टीम यांनी हा कार्यक्रम यांच्या सुमधुर शास्त्रीय, भक्तिगीते, भावगीत अश्या शब्दसुराणी सजवला अतिशय सुमधुर आवाजात अनेक गाण्यांनी जेष्ठ नागरिक व जनतेचे मन तृप्त केले.
सांज पाडवा सुरुवात प्रा. डॉ. अनिल रामकृष्ण सोनुने (उकळीकर) यांनी, निवेदन प्रा. प्रवीण अ. जोशी यांनी तर सहगायक – विवेक काळे, कु. प्रिती पाठक, कु. दिशा वानखेडे पखवाज श्री. संतोष शिंदे,तबला ओंकार पाठक,राम बारटक्के हार्मोनियम शिवा लांडगे यांनी कार्यक्रमाला रंगत आणली कार्यक्रम सुरुवात दीप प्रज्वलन करुन झाली संचालन जितेंद्र घुले यांनी केले अथितींचे स्वागत ‘मी लोणारकर’ टीम च्या चमुनी केले आभार प्रदर्शन निसर्ग फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.या कार्यक्रमाला अनेक जेष्ठ नागरिक व संगीत प्रेमी उपस्थित होते.