मेहकर लोणार मतदारसंघात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होईल : डॉ ऋतुजा चव्हाण
लोणार लाईव्ह वृत्त : पंढरीनाथ डोईफोडे : २३ ऑक्टोबर
मेहकर-लोणार मतदारसंघात मुलभूत सुविधांचा अभाव आहे. येथील जनतेचा विकास झालेला नाही. महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत. शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. आरोग्याच्या समस्या सुटलेल्या नाहीत. या मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी, विविध समस्या जैसे थे आहेत. एखाद्या गावात सभामंडपसाठी निधी दिला म्हणजे विकास झाला नाही. गावागावात स्मशानभूमी नाहीत. त्यामुळे येथील कोणतीच विकासाची कामे झालेली नसल्याने हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. आता सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या गप्पा करु नये, आता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे. अशा वंचित बहुजन आघाडीच्या महिला उमेदवार डॉ ऋतुजा चव्हाण यांनी मेहकर येथे पत्रकार परिषदेत नांव न घेता घणाघात केला आहे.
मेहकर येथे वंचित बहुजन आघाडीकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत महिला उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यावेळी पत्रकार परिषदेमध्ये डॉ. ऋतुजा चव्हाण, ऋषांक चव्हाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठनेते भाई महेंद्र पनाड, तालुकाध्यक्ष मोबीन भाई, लोणार तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, युवा तालुकाध्यक्ष आबाराव वाघ, जेष्ठ नेते वसंतराव वानखेडे, अॅड बबनराव वानखेडे, मिलिंद खंडारे, पवन अवसरमोल, गौतम गवई, यांच्यासह अनेक लोणार – मेहकर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेमध्ये डॉ. ऋतुजा चव्हाण म्हणाले की, सर्वप्रथम मी श्रेद्धीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मनस्वी आभार मानते. आज खऱ्याअर्थाने मेहकर मतदारसंघातील महिलांना अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी न्याय दिला असे मी मानते, कारण एक सर्वसामान्य महिलेला उमेदवारी दिली. त्यामुळे मला जनतेवर विश्वास आहे की, माझ्या पाठीमागे जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे ही लढाई धनशक्ती विरोधात जनशक्तीची आहे. त्यामुळे नक्कीच जनशक्तीचा विजय होणार आहे. अशा वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत महिला उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या.
यावेळी पत्रकारांच्या काही प्रश्नांना उत्तरे ऋषांक चव्हाण यांनी दिले त्यावेळी ऋषांक चव्हाण म्हणाले की, आपसातील मतभेद विसरून आता कामाला लागा विजय आपलाच होणार आहे. डॉ. ऋतुजा चव्हाण एक महिला उमेदवार आहेत. त्या कोणत्याही उमेदवारांचे मतांचे विभाजन करण्यासाठी उभ्या नाहीत तर त्या निवडून येण्यासाठी आणि श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आणि येथील जनतेचा विकास करण्यासाठी उभ्या आहेत. आज देशातील दिल्ली मध्ये पहा तेथील जिल्हा परिषद शाळा कशा सुसज्ज इमारती आहेत. मग महाराष्ट्रा मधील का नाही. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित यावेळी ऋषांक चव्हाण यांनी केला. आज बाहेरच्या राज्यात सोयाबीन पिकाला भाव आहे. मग महाराष्ट्रात सोयाबीन पिकाला भाव का नाही. दोन्ही ठिकाणी तर भाजपपक्षाची राजवट आहे मग असा दुप्पटीपणा का? असा पुन्हा प्रश्न उपस्थित करून ऋषांक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. आज मेहकर तालुक्यात सुख-सुविधांचा अभाव आहे. गेल्या ३० वर्षांपासून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झालेला नाही. एकवेळ तुमच्या बहिणीला म्हणजे डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांना भरघोस मतांनी निवडून आणा मग विकास काय असतो ते समजेल. पूर्वीपासून आमचे कुटुंब समाजसेवा करण्यात अग्रेसर असून आमची तळागाळातील सर्वसामान्य माणसांसोबत नाळ जुळलेली आहे. डोणगांव शहरात आम्ही जवळपास २० अनाथ मुलांना दत्तक घेऊन पालकत्व स्वीकारलेले आहे. आमचा राजकारण हा पिंड नाही. कोणाला दोष देण्यासाठी राजकारणात आलो नाही. आमचा समाजसेवेचा पिंड आहे. त्यामुळे डॉ. ऋतुजा चव्हाण या महिला उमेदवारांना एववेळ संधी द्या या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करुन दाखवू अशी ग्वाही देतो असे ऋषांक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेत, मतदारसंघातील जनताच परिवर्तन घडवून आणणार असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.