✴️ मेहकर व लोणार तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून मदत द्या-डॉ.ज्ञानेश्वर टाले व ऋषांक चव्हाण यांची मागणी
लोणार लाईव्ह वृत्त : पंढरीनाथ डोईफोडे : २० ऑक्टोबर
मेहकर व लोणार तालुक्यातील बऱ्याच गावात दि.१८ व १९ रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनीवर लोळले तर कित्येकांच्या झाकलेल्या सोयाबीन गंजीमध्ये पाणी घुसले.यातील काही गावांना शेतकरी नेते डॉ.ज्ञानेश्वर टाले व ऋषांक चव्हान यांनी भेटी दिल्या व झालेल्या नुकसानिचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली.
वडाळी व घाटनांद्रा तसेच परिसरातील बऱ्याच गावामध्ये अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीने पाहणी केली यावेळी तुर कपाशी, तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झाले असून सोयाबीनच्या सुड्या मध्ये सुद्धा पावसाचे पाणी घुसले त्यामुळे सदर सोयाबीनला कोंब आले अशा परिस्थितीत, प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून आवश्यक ती मदत करावी..डॉ ज्ञानेश्वर टाले व ऋषांक चव्हाण यांनी मागणी केली.