ज्ञानेश्वर चिभडे यांची पंचायत राज तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना उबाठाकडून सत्कार
लोणार लाईव्ह वृत्त : पंढरीनाथ डोईफोडे : ०६/०९/२०२४
लोणार : ज्ञानेश्वर चिभडे मामा यांची राजीव गांधी पंचायत राज समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे यांच्यासह सहकाऱ्यांसकडून सत्कार करण्यात आला.
शिवसेना भवन लोणार येथे पार पडलेल्या सत्कार सोहळ्यात ज्ञानेश्वर चीभडे यांच्या कार्याची गुरु गौरव करून राजीव गांधी पंचायत राज समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे, शहर प्रमुख गजानन जाधव यांच्या वतीने सत्कार समारंभ घेण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, अल्पसंख्यांकाचे तालुकाप्रमुख उमर सय्यद, अशोक सरदार, गणेश पाठे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते चिभडे मामांच्या निवडीबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.