चिंचोली सांगळे तंटामुक्त अध्यक्ष पदी माजी सरपंच विजय ओंकार सांगळे
लोणार लाईव्ह वृत्त : पंढरीनाथ डोईफोडे : ०६/०९/२०२४
चिंचोली सांगळे : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणांपासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच सामोपचाराने मिटावा या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केले.आज ०६ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत चिंचोली सांगळे येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेमध्ये विविध विषय घेण्यात आले.सोबतच ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा विषय हा प्रामुख्याने घेण्यात आला. त्यात तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसाठी, गावातील नागरिकांनी ग्रामसभेसाठी चांगलीच गर्दी केली होती.यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी माजी सरपंच विजय ओंकार सांगळे यांची अविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ग्रामसभेला सरपंच डॉ.पंजाबराव घुगे, उपसरपंच दशरथ कांबळे, ग्रामसेवक खरात साहेब, रामेश्वर सांगळे, पाईकराव सर,पांडुरंग सांगळे, पंढरी सांगळे, दिनकर कांबळे, राजू सांगळे,संतोष सांगळे,अमोल सांगळे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.