तंटामुक्ती : ग्राम येवती तंटामुक्ती अध्यक्षपदी गजानन जाधव अविरोध
लोणार लाईव्ह वृत्त : पंढरीनाथ डोईफोडे : ३१ ऑगस्ट २०२४
येवती : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणांपासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच सामोपचाराने मिटावा या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केले.आज ३१ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत येवती येथे काहीशा तणावपूर्ण वातावरणात ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेमध्ये विविध विषय घेण्यात आले.सोबतच ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा विषय हा प्रामुख्याने घेण्यात आला. त्यात तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसाठी, गावातील नागरिकांनी ग्रामसभेसाठी चांगलीच गर्दी केली होती. तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी २ उमेदवारांनी अर्ज केला. परंतु एका उमेदवाराने माघार घेतल्याने गजानन जाधव यांची अविरोध निवड झाली. आणि त्यांची बहुमताने तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.जिल्हा परिषद शाळेत पार पडलेल्या या सभेत ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच प्रयागताई पाटोळे, उपसरपंच रामेश्वर कायंदे,ग्रामसेवक राठोड, कृ.उ.बा.स.संचालक कारभारी सानप,नारायण कायंदे ,श्रीधर डोईफोडे, दशरथ शिंदे , शिवाजी सानप,बद्रिनाथ नागरे,अभिजित सानप,समाधान कायंदे,संतोष गायकवाड, पंढरी गायकवाड, प्रकाश जाधव,रामेश्वर पडघानकर, संजय मुद्देराज यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांची उपस्थिती होती.