चिखली नगर परिषद मध्ये नक्की चाललय काय ? पहिले शिवाजी महाराजांचे भगवे झेंडे फेकले घाणीच्या ठिकाणी आणि आता चक्क भारतीय तिरंगी ध्वजावरचे अशोक चक्रच गायप;अधिकारी म्हणतात तक्रार करा,मग उत्तर देवू
लोणार लाईव्ह वृत्त : शिलवंत इंगळे : २९ ऑगस्ट २०२४
चिखली : नगर परिषदेतील गैर प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला असून न.प. मध्ये अक्षरशः भारताच्या ध्वजावर ( फलकावरील ) अशोक चक्र नसल्याचे उघडकीस आले आहे.मागील वेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेले भगवे झेंडे कचऱ्यात पडलेले आढळून आले होते. महाराष्ट्रातील वातावरण हे आधीच गढूळ झालेले आहे. कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑटोमॅटिक कोसळतो तर कुठे चिखली नगरपरिषदेसारखे अधिकारी याला खतपाणी घालण्याची काम करतात. या झेंड्याच्या संदर्भात काही शिवप्रेमींनी चिखली नगरपरिषदेसमोर उपोषणही मांडले होते त्यावेळेस अधिकाऱ्यांनी माफी मागितली होती.चिखली येथील नगर परिषद ने नगर परिषदच्या आवारात लावलेल्या भारताचा राष्ट्रध्वज (फलकावर) तिरंगा वर नियमाने अशोक चक्र लावणे अनिवार्य असते परंतु चिखली नगरपरिषदेने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले असून नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांना दैनिक मातृभूमीची चे प्रतिनिधी किरण शेजोळ यांनी याबाबत माहिती विचारली असता त्यांनी उडवा उडवडीचे उत्तर देऊन माझ्या कारकिर्दीत हे झालेले नसून तक्रार करा मग मी त्याचे उत्तर देईन असे उत्तर दिले.
तरी राष्ट्रीय ध्वजावर अशोक चक्र लावले नाही म्हणून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत असून चिखली नगरपरिषद वारंवार असे चुका करीत असून या नगरपरिषदेच्या कारणामुळे तणावही निर्माण होऊ शकतो याला जिम्मेदार फक्त चिखली नगरपरिषद असेल मागील दिनांक १७/ऑगस्ट/२०२४ ला सुद्धा भगवे ध्वज त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता ते ध्वज नालीत फेकून दिले होते त्यावेळी सुद्धा नागरिकांनी आंदोलन केले होते नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करा या मागणी साठी आंदोलन केले होते तरी लवकरात लवकर चिखली प्रशासन झोपेतून उठून तिरंग्यावर अशोक चक्र कधी लावनार अशी मागणी नागरिक करीत आहेत तरी या कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कार्यवाही होईल याकडे चिखलीकरांचे लक्ष लागुण आहे.
◾️◾️◾️