चौथीच्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार;शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल;सिंदखेड राजा तालुक्यातील घटना


लोणार लाईव्ह वृत्त : प्रतिनिधी – शिलवंत इंगळे 

सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बु येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेवरील शिक्षक खुशाल उगले यांनी इयत्ता चौथीच्या वर्गातील चिमुरड्या मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली त्यामुळे परिसरामध्ये व जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे,आरोपी शिक्षक खुशालराव उगले हे इयत्ता चौथीच्या वर्गाला वर्गशिक्षक होते.

Advertisement

वर्दडी बु येथील पालक व 3 मुलींनी थेट पोलीस स्टेशन गाठून झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली.आरोपी शिक्षकाविरुद्ध विविध कलमाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबती सविस्तर असे की,वर्दडी बु येथील जिल्हा परिषद शाळा असून या ठिकाणी इयत्ता १ ते ८ वर्ग आहेत.मागील एक ते दीड वर्षापासून आरोपी शिक्षकांची नियुक्ती होवून कार्यरत होते.त्यांच्याकडे मागील वर्षी त्यांच्याकडे इयत्ता ३ चा वर्ग होता.यावर्षी वर्ग ४ था होता.इयत्ता ४ थीला खुशाल उगले नावाचे शिक्षक आहेत,सदर शिक्षक हे स्वतः वर्ग शिक्षक असलेल्या विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन करत असल्याचे पालकांना सांगितले. शिक्षक वाईट कृत्य करतच होता परंतु ही घटना वाढतच गेल्याने काही सामाजिक कार्यकर्ते तथा ऍड प्रदिप सोनकांबळे, विठ्ठल सोनकांबळे यांच्या पर्यंत गेल्याने या घटनेला वाचा फोडण्यासाठी त्यांनी पालकांना सोबत घेऊन किनागव राजा पोलीस स्टेशन गाठले आणि किनगाव राजा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनोद नरवडे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली आणि सत्य परिस्थिती जाणून घेतली,त्यानंतर उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांनी सुद्धा त्या चिमुरड्या मुली सोबत वर्दडी बु या शाळेला भेट दिली.

या दोन्ही पोलीस अधिकारी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ या शिक्षकां विरोधात विविध कलमांव्ये गुन्हा दाखल केला असून या शिक्षकां विरोधात तालुक्यातील पालका मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.अप क 183/2024 कलम 64(2) (f) (1) (m),65(2), 76(1) (1)B.N. 5. सह कलम 4, 6,8,10,12 का.से.अ.प्र.अधि. 2012, सहजम 3(1) (w) (1) (1) (2) (v).3 (1) (R) (s) (w), गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम ठाणेदार विनोद नरवाडे करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!