बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या लोणार बंदची हाक;तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन
लोणार लाईव्ह वृत्त : पंढरीनाथ डोईफोडे : २३ ऑगस्ट २०२४
स्त्रियांच्या सन्मानासाठी, लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी, समाजाच्या संवेदन शीलतेसाठी, कायदा सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी, झोपी गेलेल्यांना जागे करण्यासाठी बदलापूर, कलकत्ता तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात घडणाऱ्या लैंगिक घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या माध्यमातून ऊद्या दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी लोणार बंदची हाक देण्यात आलेली आहे.
त्या अनुषंगाने लोणार तालुका महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी लोणार तालुका व शहर बंद ठेवले जाणार आहे.करिता सर्व जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजूभाऊ मापारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन खरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप मापारी,आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक सचिव गणेश सोळंके, शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन जाधव, काँग्रेसचे शहर अध्यक्ष समद शेख, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, उपनगराध्यक्ष बादशाह खान, माजी नगराध्यक्ष साहेबराव पाटोळे, नगरसेवक तौफिक कुरेशी, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, अंबादास इंगळे, माऊली मोरे यांच्यासह सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.