उद्धव साहेबच महाराष्ट्राचे नेतृत्व करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू शकतात – डॉ. गोपाल बछिरे


लोणार लाईव्ह वृत्त : lonar live news पंढरीनाथ डोईफोडे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे नेतृत्व करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू शकतात असे वक्तव्य शिवसेनेच्या तालुकास्तरीय कार्यक्रमात जिल्हा संघटक प्रा.डॉ. गोपाल बछिरे यांनी केले.

शिवसेना भवन लोणार येथे भगवा सप्ताह समारोपाच्या आयोजित कार्यक्रमात डॉ. बछिरे बोलत होते, ते पुढे म्हणाले विरोधक उद्धव साहेबांच्या शिवसेनेस शिल्लक सेना असे उपहासात्मक बोलत होते परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमाने शिल्लक सेना काय करू शकते हे लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांना दाखवून दिले शिवसेना,राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षात फोडतोड करून भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व राष्ट्रवादी व काँग्रेस संपवण्याचा अतोनात प्रयत्न केला परंतु शिवसेना, राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस या जनसामान्यांच्या मनात मनात रुजलेल्या आहेत, नेते फुटले नेत्यांचे ठेकेदार फुटले परंतु शिवसैनिक तथा कार्यकर्ते हे फुटले नाही. विजयभाऊ मोरे कृ.उ.बा.स. यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.

Advertisement

या कार्यक्रमास, महाविकास आघाडीचे ज्ञानेश्वर चिबडे मामा, शहर प्रमुख गजानन जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, तालुका उपप्रमुख परमेश्वर दहातोंडे,श्रीकांत नागरे शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख राजूभाऊ बुधवत,युवासेना तालुकाप्रमुख जीवन घायाळ, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, अल्पसंख्यांक शहर प्रमुख इकबाल कुरेशी, युवा तालुकाउपप्रमुख अमोल सुटे, महिला उपजिल्हा संघटिका संजीवनी वाघ, तालुका संघटिका पार्वतीताई सुटे, शहर संघटिका शालिनीताई मोरे, तानाजी अंभोरे अशोक सरदार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!