आता आधार कार्डशिवाय लोणार सरोवरात प्रवेश नाही;नियमांचे पालन न केल्यास कड़क कार्यवाही होणार;ठाणेदार निमिष मेहत्रे यांची माहीती
लोणार लाईव्ह वृत्त : पंढरीनाथ डोईफोडे : दिनांक ७/८/२०२४
लोणार सरोवरावरात अधुन मधून घडणाऱ्या गंभीर घटना लक्षात घेता येथील ठाणेदार निमिष मेहत्रे यांनी सरोवर तसेच विरज धारातिर्थावर आधार कार्डशिवाय कुणालाही प्रवेश देवू नये आणि याचे कुणी उल्ल॔घन केल्यास कडक कार्यवाही केल्या जाईल अशा सुचना वन्यजीव अभ्यारण्य व पुरातत्व विभागास दिल्या आहेत.
दिनांक २ ऑगस्ट रोजी शेलू तालुक्यातील अर्जुन रोडगे यांचा सरोवरात खून झाला त्या नंतर सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणार पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे वन्यजीव अभारन्य विभाग पुरातत्व विभाग यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावून त्यांची बेठक घेऊन या नंतर धार गेट वरून कोणीही विना परवानगी आत जाऊ नये प्रत्येकाच्या आधार कार्ड झेरॉक्स व मोबाईल नंबर घेतल्या शिवाय आत मध्ये प्रवेश देऊ नये.
विना आधार जर कोणी तुम्हला आत जाण्यास जबरदस्ती करीत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन ला संपर्क करावा तसेच जाणाऱ्या व्यक्ती ला जातांना टोकन देण्यात येईल व परत येतांना ते टोकन जमा करावे लागतील अश्या प्रकारच्या सूचना त्यांना लेखी व तोंडी देण्यात आल्या कायदा जर कोणी हातात घेत असल्यास त्याची गय केली जाणार नाही या वेळी लोणार बिट जमादार संतोष चव्हाण जमादार संजय जाधव पो कॉ अनिल शिंदे पुरातत्व विभागाचे एम टी एस मनीष कुमार प्रिन्स कुमार अनिल फोलाने राम मादनकर उपस्थित होते.