लोणार सरोवर फिरायला आला आणि घात झाला; ३० वर्षीय युवकाचा गळा दाबून खून; २ आरोपी अटक;अवैध संबंधातून घडली घटना  


लोणार लाईव्ह वृत्त / lonar Live News : पंढरीनाथ डोईफोडे

लोणार सरोवर  – दि. ६ आगस्ट २०२४  लोणार – सरोवरतील यज्ञेश्वर मंदिरा जवळील दर्गा रोड बाजूला घनदाट जंगलात शेलू जी. परभणी येथील ३० वर्षीय युवकाचा गळा दाबून खून केल्याची घटना दि. ५ आगस्ट रोजी रात्री ११ वाजे दरम्यान उघडीस आली होती. यामुळे लोणार शहरात एकच खळबळ उडाली होती. आता हे प्रकरण अवैध संबंधातून घडल्याचे उघड झाले आहे. आणि या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

परभणी जिल्यातील शेलू तालुक्यातील २७ वर्षीय युवक अर्जुन दिलीप रोडगे रा.रवळगाव हा दि. २ आगस्ट पासून घरी न आल्याने त्याचे वडील दिलीप बाबाराव रोडगे यानी शेलू पोलीस स्टेशन ला बेपत्ता झाल्याची तक्रार ३ आगस्ट रोजी दाखल केली होती. पोलीसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरविली असता. मृतक अर्जुन रोडगेचे गावातीलच २९ वर्षीय अर्चना विठ्ठल सरोदे या महिलेशी अनेतिक संबंध असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन. पोलिसी खाक्या दाखवीताच ती पोपटा सारखी बोलू लागली. तिने साथीदाराच्या मदतिने आपल्या प्रियकराचा रुमालाच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.

Advertisement

सदर खून लोणार सरोवरात करून मृत्यूदेह घनदाट जंगलातील जाळीत फेकून दिल्याची माहिती पोलीसांना देताच शेलू पोलीसाचे पथक दि. ५ आगस्ट रोजी रात्री १० वाजता महिला आरोपी अर्चना सरोदे हिला लोणार सरोवरात घटनास्थळावर घेऊन आले ह. शेलू पोलिसांनी वन्यजीव विभाग कर्मचारी यांच्या मदतीने घटनास्थळा वर घेऊन जाऊन तिने मृतक अर्जुन चा मृतदेह पोलीसांना दाखविला. व दुसरा आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली आहेलाजी डुकरे वय २४ रा. खेरूळा ता. पाथरी जी. परभणी यांच्या मदतीने मृतक अर्जुनचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले. मृतक व आरोपी यांनी लोणार सरोवर फिरायला जाण्याचा बेत आखला २ आगस्ट रोजी स्कुटीने लोणार सरोवरात आले.आरोपी महिला अर्चना समोर आली नंतर दुसरा आरोपी मृतक अर्जुन रोडगेचा मृतदेह दर्गा रोडवर असलेल्या चिंचेच्या झाडा समोरील जाळीत फेकून मागून येऊन स्कुटीने आपल्या गावी निघाले असता मंठा तालुक्यातील ढोकसाळ येथे आरोपिणी आपली विना नंबर गाडी तेथे सोडून दिली. व खाजगी वाहणाने आपल्या गावी गेले.दि. ६ आगस्ट रोजी सकाळी शेलू पोलीस पथकाणे मृतक अर्जु रोडगे यांचा मृत्यूदेह सरोवरातून वर आणून शवविच्छेदनासाठी लोणार ग्रामीण रुग्णालयात आण्यात आला होता.आरोपी वर खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पीएस आय अशोक जटाळ, एपी आय संजय चव्हाण, प्रमोद देशमुख, पोलीस कर्मचारी अजय रासकटला, मनोहर कोपणार, सोपान दुबे, अनिल शेवाळे, माधव गोरे, इब्राहिम शेख, अमोल वाडेकर हे करीत आहे.

◾️◾️◾️


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!