बेजबाबदार लोकप्रतिनिधीवर कायदेशीर कारवाई करा-डॉ.गोपाल बछिरे
लोणार लाईव्ह वृत्त : पंढरीनाथ डोईफोडे
मेहकर / ०२ ऑगस्ट २०२४ बेजबाबदारीने वागणाऱ्या लोकप्रतिनिधीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्याकडे केली आहे.
मेहकर येथील मँगो हॉटेल जवळील डीपी रोडच्या मधोमध असलेले पथदिव्याचे खांब (स्ट्रीट लाईट) काढून तेथे अवैधरित्या सहा सात दिवसापासून डीपी रोड बंद करण्यात येऊन तेथे भला मोठा पेंडॉल लावण्यात आला आहे व हे एक प्रकारे अतिक्रमण आहे एकतर पथदिव्यांचे खंबे काढून टाकून शासनाच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे व दुसरे म्हणजे गत सहा सात दिवसापासून अवैधरित्या डीपी रोड बंद करून तेथे एका लोकप्रतिनिधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे आम्ही ऐकून आहोत करिता सदगीर कार्यक्रमाचे आयोजक व ज्या लोकप्रतिनिधीचा कार्यक्रम तिथे घेतला जात आहे त्यांच्यावर शासनाच्या मालमत्तेची नुकसान व डीपी रस्ता बंद करून जनतेस मनस्ताप देण्यात आला त्याविरुद्ध तत्काळ कार्यवाही करून सामान्य जनतेस न्याय द्यावा अशी मागणी डॉक्टर कशी आहे यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांना निवेदन देऊन केली आहे याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.