तंटामुक्त अध्यक्ष असावा तर असा;बारलिंगा येथे अवैध देशी दारू जप्त;राज्य उत्पादन शुल्काची कारवाई
सिंदखेडराजा तालुक्यातील मौजे बारलिंगा येथे तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र नागरे यांच्या पुढाकारातून अवैध देशी दारू विक्रेत्यावर २५ जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्काद्वारे कारवाई करण्यात आली.
याबाबत सविस्तर असे की,बारलिंगा येथे अवैध देशी दारूची जोमात विक्री सुरू होती. या संदर्भात बारलिंगा गावच्या महिलांनी तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र नागरे यांच्याकडे कैफियत मांडली की दारूमुळे आमचे संसार उध्वस्त होत आहेत. लहान मुले व्यसनाधीन बनत आहे. आम्हाला असे झाले आहे की, राजाने मारले. पावसाने झोडपले तर फिर्याद न्यायची कुणाकडे. याची दखल घेत तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र नागरे यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला लेखी व तोंडी तक्रारी देऊन सुद्धा काहीच फायदा झाला नाही. शेवटी कंटाळून राजेंद्र नागरे यांनी उत्पादन शुल्क चिखली यांना या प्रकरणाची माहिती दिली.
त्यामुळे दिनांक 25 जुलै 2024 रोजी उत्पादन शुल्काचे निरीक्षक श्री. आर एन रोकडे. दुयम निरीक्षक एस बी रोटे. जी व्ही पहाडे. ए पी तिवाने. एस डी जाधव. यांनी अवैध दारू विक्री करणारा अतुल दिनकर भुसारी बारलिंगा याच्या राहते घरी छापा टाकला. या छाप्यात त्यांना देशी दारू 8.64 लिटर किंमत अंदाजे 3360 रू. आढळून आली. आता व्यसनाधीनतेवर आळा बसणार एवढे मात्र खरे. त्यामुळे तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र नागरे यांचे महिला वर्गातून विशेष आभार मानल्या जात आहे.