नाशिक मध्ये दोन समाजात तेढ निर्माण करणारे पत्रक व्हायरल;पंचवटी परिसरात तणाव
लोणार लाईव्ह वृत्त (शिलवंत इंगळे) दि.22 जून 2024 रोजी नाशिक मध्ये काळाराम मंदिर पंचवटी परिसरात दोन समाजात तेढ निर्माण करणारे एक पत्रक व्हायरल करण्यात आल्याने त्या समाजकंटकाला त्वरीत अटक करण्यासाठी दलित बांधवांकडून निदर्शन करण्यात आले.
प्रसिद्ध काळाराम मंदिर परिसरात महार, मांग, चांभार ,ढोर इत्यादी लोकांनी पायात चपला घालू नये, मंदिरात प्रवेश करू नये, आजूबाजूला निळे झेंडे लावू नये असे झाल्यास परत तुम्हाला मागचे दिवस आणल्याशिवाय राहणार नाही.तुमच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मटके बांधल्या शिवाय राहणार नाही असे संतापजनक पत्रक व्हायरल करण्यात आले. त्यामुळे नाशिक पंचवटी मधील समस्त बांधव पोस्ट व्हायरल करणाऱ्याला अटक करावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.