प्रा.हाके आणि वाघमारे यांच्या ओबीसी आंदोलनाला लोणार मधून पाठिंबा


लोणार लाईव्ह वृत्त (पंढरीनाथ डोईफोडे) प्रा. हाके आणि वाघमारे यांच्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनास लोणार मधून पाठिंब्याचे पत्र तहसीलदारा रामप्रसाद डोळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले व ओबीसी बचावच्या घोषणांनी तहसील परिसर दणाणून सोडला. ओबीसी आरक्षण बचावासाठी गेल्या सात दिवसांपासून वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे आमरण उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना पाणी पिणे व उपचार घेण्याची विनंती केली आहे.

Advertisement

या उपोषणाला पाठिंबा देत असताना ओबीसी आरक्षणाला आमचा कोणाचाही विरोध नाही परंतु ओबीसी आरक्षण देत असताना लोकसंख्येनुसार ओबीसी आरक्षण कोटा केंद्र सरकार कडून वाढवुन घ्या व आरक्षण द्या असे निवेदनात म्हटले आहे

तहसीलदार रामप्रसाद डोळे यांना निवेदन ॲड. शिवाजी सानप, डॉ. गोपाल बशीरे , गजानन जाधव, शहर लुकमान कुरेशी, राजूभाऊ बुधवत, सुदन अंभोरे, किसनराव आघाव बळीराम दराडे सुनील सानप सुनील सांगळे, विनोद डोळे, रामेश्वर आघाव, सुनील आघाव, गणेश पाठे, अजय बच्छिरे यांच्यासह मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!