एकांबा शेतशिवारातील रस्त्याची पहिल्याच पावसात दुरावस्था 


काय तो रस्ता…काय तो चिखल…काय त्या बेजाऱ्या !

लोणार लाईव्ह वृत्त : शिलवंत इंगळे मेहकर

मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी ते एकांबा शेतशिवारात जाणाऱ्या रस्त्याची पहिल्याच पावसात अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. जुना रस्ता होता तो नवीन डांबरीकरण करण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आला. परंतु हा रस्ता अर्धवट झाल्यामुळे पहिल्या रस्त्यापेक्षा आता खूप मोठी दयनीय अवस्था रस्त्याची झाली आहे. पेरणीसाठी शेतात ट्रॅक्टर नेण्याचा प्रश्न शेतकऱ्यांवर उभा ठाकला आहे.

Advertisement

दिनांक १७ जून रोजी या रस्त्यावरून ट्रॅक्टर घसरून थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. निदान जेवढा रस्ता बनवायचा तेवढा संबंधित ठेकेदाराने पूर्ण बनवायला हवा होता अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गांमधून उमटत आहे.

यामुळे शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती संजय मगर, पांडुरंग मगर, राजेश मगर, सुशिलाबाई मगर, मंगला बाई मगर, शोभाबाई मगर, गणेश मगर, भानुदास मगर, योगेश्वर महाराज मगर, सचिन सुभाष मगर, बंडू बळी,यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. लवकरात लवकर संबंधित ठेकेदार यांनी रस्ता व्यवस्थित करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा १७ जून रोजी वरील शेतकऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा या बाबीकडे लक्ष द्यावे व शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकरी वर्गांकडून होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!