पंकजाताई मुंढे यांच्या पराभवाने युवकाची आत्महत्या
लोणार लाईव्ह वृत्त : lonarlivenews : ८ जून २०२४
लोकनेत्या पंकजाताई मुंढे यांचा बीड येथून झालेला पराभव जिव्हारी लागून लातूर जिल्ह्य़ातील अहमदपूर तालुक्यातील यस्तार या गावचे रहिवाशी असलेले सचीन कोंडिबा मुंढे यांनी एसटी बसखाली उडी घेवून आत्महत्या केल्याची दुर्दवी घटना ०७ जूनच्या रात्री घडली.
आत्महत्या करण्यापूर्वी सचिन ३ ते ४ दिवसांपासून नैराश्यात असल्याचे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणने आहे.निवडणुकी नंतर सचिनने फेसबुक पोस्ट करत पंकजाताई निवडून न आल्यास सच्या गेला अशी पोस्ट केली होती.त्यावेळी सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते परंतू पराभवानंतर सचीन हा जेवणही करत नव्हता व नाराज राहायला लागला होता.माझी बहिण निवडणुकीत पराभूत झाली आता मी राहून काय करू असे तो घरच्यांना सतत बोलत होता.आई, भाऊ यांनी समजावून सांगूनही सचीन ऐकला नाही आणी त्याने एसटी बसखाली उडी घेवून आत्महत्या केली.
त्यांच्या अशा दुर्दैवी जाण्याने कुटुंबासह मुंढे भक्तांना अतीव दुःख झाले आहे.हार जीत चालुच असते त्यासाठी कुणीही असे पावेल उचलून आपल्या घरच्यांना पोरके करू नये.आपण निराश न होता परत लढायला सज्ज आहोत.आपला वारसाच संघर्षाचा आहे.अशा भावना पंकजाताई यांनी व्यक्त केल्या आहेत.