baccha baji “बच्चा बाजी” ही घृणास्पद प्रथा आपल्याला माहित आहे का !
लोणार लाईव्ह वृत्त : पंढरीनाथ डोईफोडे
‘बच्चा बाजी’ ही घृणास्पद प्रथा कुठे प्रचलित आहे आणि कशी आहे हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ठावूक नसेल…कोवळ्या मुलांचे या प्रथेत मात्र शोषण होत असल्याने सर्व स्तरांतून विरोध होत आहे. चला तर जाणुन घेवूयात अफगाणिस्तानात प्रचलित असलेली ही प्रथा आहे तरी काय ! मुळात ही प्रथा लहान मुलांच्या वेश्याव्यवसायाशी जोडलेली आहे. अफगाणिस्तानबरोबरच पाकिस्तानमध्येही मुलांच्या सट्टेबाजीची परंपरा आहे. सविस्तर माहिती वाचून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.
‘बच्चा बाजी’ म्हणजे नेमकं काय?
‘बच्चा बाजी’ ही एक प्रकारची प्रथा आहे, ज्यात 10 वर्षे वयाच्या मुलांना श्रीमंत लोक मुलींचे कपडे घालायला लावतात व पार्ट्यांमध्ये नाचवतात. हे सर्व मुलांच्या टॅलेंटला प्रोत्साहन देण्यासाठी नसते तर यामुळे मुलांवर अत्याचार देखील होतात.
या प्रथेमध्ये मुलांना मुलींचे कपडे घालून, खोटे स्तन लावून, मेक-अप करून आणि पायात घुंगरू बांधून अश्लील गाण्यांवर पार्ट्यांमध्ये नाचवले जाते. ‘ऐ लड़के, तुमने मेरे बदन में आग लगा दी है’ यासारखे गाण्यांचे बोल असतात. एकदा का मुलाने मुलीसारखा मेक-अप केला की त्यानंतर तो कायमच या गर्तेत फसत जातो.
जुनाट आणि प्रतिगामी विचारसरणीचे लोक असल्यामुळे व तेथील नियमांमुळे स्त्रिया बहुतेक सार्वजनिक ठिकाणी भेट देऊ शकत नाही आणि त्यांना पार्टी व नृत्य करण्यास मनाई आहे. त्यामुळे नाचणाऱ्या महिलांची जागा या मुलांना घ्यावी लागली आहे.
स्त्रियांशी संवाद साधणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असल्याने प्रौढ पुरुषांचे मनोरंजन करण्यासाठी ‘डान्स’ शिकवलेली अल्पवयीन मुले कामी पडतात. मग पारंपारिक अफगाणी संगीताच्या तालावर हे लोक अक्षरशः बेधुंद होतात. मैफिल संपल्यावर पुरुष त्यांच्या आवडत्या नृत्य करणाऱ्या मुलाबरोबर रात्र घालवण्याच्या संधीसाठी उत्सुक असतात.ज्या पुरुषांना स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त इंटरेस्ट असतो, असे पुरुषही मैफलीला हजेरी लावतात.
बरीच मुलं अशा लोकांच्या तावडीतून बाहेर आली आहेत आणि त्यांनी त्यांच्या वेदना कथन केल्या आहेत. तसेही अफगाणिस्तानमध्ये समलैंगिकतेला गैर-इस्लामिक आणि अनैतिक मानले जाते. तेथे ही प्रथा अगदी सामान्य गोष्ट आहे, ज्यात मुलांवर बलात्कार होतात.
तालिबानने अफगाणिस्तानमधील बहुतांश भागावर आपला कब्जा केला आहे. त्यामुळे विमानतळापासून ते रस्त्यांपर्यंत सर्वत्र तालिबानचेच नियंत्रण आहे. येथील नागरिक दहशतीमुळे आणि भीतीपोटी आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
असे म्हटले जात आहे की, तालिबानच्या राजवटीत महिलांचे स्वातंत्र्य पूर्णपणे हिरावून घेतले जाईल. महिला आणि मुलांवर भयानक अत्याचार होतील आणि देशात अनेक कुप्रथांना सुरुवात होईल.
परंतु सर्व वाईट प्रथा-परंपरा तालिबानमुळेच येतील असे नाही, तर काही वाईट परंपरा फार आधीपासूनच अफगाणिस्तानात सुरू आहेत. यातील एक परंपरा म्हणजे ‘बच्चा बाजी’.(“bacha bazi”/”boy play”)