पुणे अपघात प्रकरणातील रॅप बनविणाऱ्या मुलावर अखेर गुन्हा दाखल
लोणार लाईव्ह वृत्त : lonar live news
पुण्यातील अपघात प्रकरण देशभरात तापल्यानंतर पोलीस अँक्शन मोडवर आले आहेत. पुणे अपघात प्रकरणी फेक व्हिडीओ बनवून चर्चेत आलेल्या आर्यनवर पुणे पालिसांनी pune police अखेर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. मात्र आर्यनचे म्हणणे आहे की मूळ प्रकरणावर दुर्लक्ष करण्यासाठी त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे मी फक्त कंटेंट क्रिएटर आहे.
आर्यन पूढे म्हणाला की, मी माझ्या सोशल मीडियावरील स्टोरीजला पॅरोडी व्हिडीओ लावले होते. मीडियावाल्यांनी ती चोरी करुन त्यांच्या पेजवर सर्क्युलेट केले. त्यांनी सांगितलं मी दोघांचा जीव घेणारा क्रिमिनल आहे का ? माझ्यावर सेक्शन ’41 अ’ , 509 आणि 294 च्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचे सर्व लक्ष माझ्यावर केंद्रित करत आहेत. मूळ प्रकरणातून सर्वांचं दुर्लक्ष करता यावं यासाठी हा सर्व खटाटोप आहे आहे. तो करोडपतीचा मुलगा आहे, त्यामुळे हे सर्व करत आहेत. मी मध्यमवर्गीय मुलगा आहे. मला मारुन टाका, माझ्या जीवाची काही किंमत नाही. मी कोणाला व्यक्तीगत आई-बहिणीवरुन शिवी दिली नव्हती.
पुढे बोलताना आर्यन म्हणाला, मी पॅरेडीमधून रॅप rap बनवला होता. पण यांनी मलाच क्रिमिनल बनवलं आहे. त्या मुलाला एका दिवसात जामीन मिळतो, कारण त्याचे वडिल करोडपती आहेत. मला 25 तारखेच्या रात्री पुणे पोलिसांची नोटीस आली. 27 तारखेला पुणे पोलिसांत हजर होण्यास सांगण्यात आलं. माझ्या घरापासून पुण्याचा रस्ता 40 तास दूर आहे. लोव्हर क्लास फॅमिलीमधून येतो. माझ्याकडे कार नाही. तिथे यायला मला 40 हजार रुपये लागतील. मला तिथे जामिनासाठी पैसे द्यावे लागतील. काही माहिती मला तिथे क्रिमिनलच घोषित केलं जाईल.
केवळ प्रसिद्धीसाठी केलेला हा खटाटोप आर्यनच्या आता अंगलट येताना दिसत आहे.आर्यनने आपल्या रॅपमधून शिविगाळीची आणि दुस-याला बदनाम करण्याची भाषा वापरली होती. त्याला यातून ब-यापैकी प्रसिद्धी सुद्धा मिळाली होती. नंतर अग्रवाल कुटुंबाकडून हा व्हिडीओ आमच्या मुलाचा नसल्याचा खुलासा करण्यात आला होता.
#marathi #MarathiNews #news #NewsUpdate #newsfeed