पर्यावरणाचा संदेश देत पार्डा दराडे येथील शिक्षकाची कन्याकुमारी सायकल यात्रा
लोणार लाईव्ह वृत्त | Lonarlive News | पंढरीनाथ डोईफोडे
तालुक्यातील पार्डा दराडे येथील युवा शिक्षक सुरज दराडे हे आपल्या चार साथीदारांसह पर्यावरण एज्युकेशन फॉर एवरी चाईल्ड व एम्पावरींग वुमन ॲन्ड गर्ल्स एज्युकेशन [ pedal for 3 E’s ] असा मौलिक संदेश देत ०७ मे रोजी सकाळी ५:०० वाजता आपली कर्मभूमी नांदुरा येथून कन्याकुमारी सायकल यात्रेला निघाले आहेत.यामधे सुरज दराडे यांचे सोबत अमर फाटे,दीपक फाळके,संदीप पिवळतकर, ज्ञानेश्वर इंगळे आदी शिक्षकांचा समावेश आहे.
नांदुरा ते कन्याकुमारी हा २५०० किमीचा प्रवास ते २२ दिवसात पूर्ण करणार आहेत.यासाठी त्यांना रोज १०० ते १५० किमीचा रोज प्रवास करावा लागणार आहे.ऐन उन्हाळ्यात एवढ्या दुरच्या सायकल भ्रमंतीसाठी नांदुरावाशियांनी त्यांना शुभेच्छा देवून त्यांच्या या धाडसाचेही कौतूक केले आहे.अजिंठा ,वेरूळ, संभाजीनगर, पैठण,सोलापूर, विजयपूर, बेंगलोर, म्हैसूर, उटी,मुन्नार, मदुराई, रामेश्वरम, धनुष्यकोडी व कन्याकुमारी असा त्यांचा प्रवास असणार आहे.
याप्रसंगी बुलढाणा येथील आंतरराष्ट्रीय सायकलपटू संजय मयुरे यांनी प्रवासातील अडिअडचणींबद्दल सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले.नांदुरा शहरातील सायकलपटुंनी तर सायकल रॅली काढून आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या.