Buldhana – लोणारच्या मातीत चित्रीत झालेला “तुच माझी साक्षी” चित्रपट ३१ में ला प्रदर्शित


चिंचोली सांगळे येथील स्थानिक कलाकारांचाही समावेश

लोणार लाईव्ह वृत्त । Lonar Live News । पंढरीनाथ डोईफोडे

शेतकऱ्यांच्या व्यथा व साक्षीच्या प्रेमाची हृदयस्पर्शी कथा मांडणारा श्रृती फिल्म्स निर्मित ‘तुच माझी साक्षी’ Tuch mazi sakshi हा मराठी चित्रपट प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर म्हणजे तब्बल ७ वर्षानंतर येत्या ३१ में पासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात बघायला मिळणार आहे.विश्व प्रसिद्ध लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील अभिनया पासून कोसो दूर असलेली माणसं सोबत घेवून लेखक,दिग्दर्शक विलास गाडगे Vilas Gadage यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे.चित्रपटाचे ९० % चित्रीकरण चिंचोली सांगळे व लोणार तालुक्यातील असल्याने जिल्हावाशियांसाठी हा चित्रपट मेजवानी ठरणार आहे.

चित्रपटाचे कथानक हे Farmar शेतकरी,नापिकी,सावकारी,प्रेम आदी विषयांभोवती फिरणारे आहे.खूप मोठ्या संघर्षातून या चित्रपटाची निर्मिती केली असल्याचे निर्माते गाडगे सांगतात.तब्बल ७ वर्षाचा मोठा कालावधी लोटल्यामुळे यामधील काही कलाकारांचा संपर्क सुद्धा तुटला असून काही अभिनेत्रीचे लग्न सुद्धा झाले आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून( रामू ) आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो .परंतु रामुची पत्नी राधाच्या हिमतीने परत तो लोकांशी लढून व समाज कंटकांशी लढून आपल्या परिस्थितीवर मात करतो आणि रामुची बहीण साक्षी ही गर्भश्रीमंत मुलाच्या प्रेमात पडते असा हा साक्षीच्या निरागस प्रेमाची साक्ष देणारा हा मराठी चित्रपट 31 मे 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातील काही गीते सोशल मिडियावर खूप गाजत आहेत.

Advertisement

जसे या चित्रपटामध्ये दृश्य घडले आहे असेच काही दृश्य लेखक/निर्माता /दिग्दर्शक. विलास गाडगे यांच्या जीवनामध्ये घडले आणि घडत आहे. असे विषय सरासरी प्रेक्षकांच्या हिताचे कुणीच मांडण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु यांनी जो प्रयत्न केला आहे तो खरच कौतुकास्पद आहे. तरी प्रेक्षक वर्गाला विलास गाडगे यांनी विनंती केली आहे .प्रेक्षक मायबाप हो बंधू भगिनींना माझी आग्रहाची विनंती आहे .आपण हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहा मध्ये जाऊन अवश्य बघावा व या चित्रपटाला भरभरून यश द्यावे.ज्यामुळे माझ्या छोट्याशा प्रयत्नाला बळकटी मिळणार आहे.

यातील सर्व कलाकार विदर्भातील व मराठवाड्यातील असून उत्कृष्टरित्या त्यांनी काम केले आहे. संगीतकार अभि/राम व गायक /गायिका यशश्री भावे ,श्रुती चौधरी ,मुकुल पांडे , अभिजित कौसंबी गीतकार – रोशन गौतम (पंडित), आश्रुबा सोडणर , कैलास भारस्कर असून यातील मंत्रमुग्ध गाणी सद्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत. तसेच यातील कलाकार -संदीप बुरडकर ,प्राची सरकार, राहुल बारापात्रे ,आकांक्षा साखरकर ,सुनील हिरेखन, अजय राज, राणी बलवीर, सुजित मोरे, उर्मिला विभुते, कंचन( खुशी )कांबळे, देवेंद्र ढिवरे, अविनाश जावळकर, मीनाक्षी खरात ,रोशन जाधव, शुभम यंगल ,नरेश घोडके ,दुर्गेश्वरी कछवाह, ललिता घनसावंत उत्तम घुगे, दीपक कांबळे, दीपक डफाडे, विकास देसाई, बाळू सरोदे, कैलास भारस्कर,संजयसावंत, अमित राठोड, देवकीनंदन, राजू केदार, अरविंद वाघधरे, खुशी विभूते, तेजस्विनी राठोड, संजय तेजनकर, आश्रुबा सोडणर, रवींद्र खरात, महेश ठाकरे, आकांक्षा देशमुख, अनिल गावंडे, अनंत हटवार, मोरेश्वर खोडे ,मधुकर हटवार ,संतोष साळुंखे, तेजस गाडगे.

कॅमेरामॅन – सुभाष जयस्वाल ऑफिस सुपर व्हिजन – शारदा गजभिये. प्रोडक्शन मॅनेजर – अशोक अंबागडे कोरीयोग्राफर – मंगेश देवके , संकलन – भूपी / विर प्रसाद , असिस्टंट डायरेक्टर – प्रकाश सिंह , आशिष मेश्राम.पोस्ट प्रोडक्शन – शंकुंतलम स्टुडिओ मुंबई.कार्यकारी निर्माता – शीतल गाडगे, तेजस गाडगे .विशेष सहकार्य – संगीता गाडगे यांचे आहे.एकंदरीत आपल्या जिल्ह्यातील, आपल्या मातीतील कलाकारांचा हा चित्रपट असल्याने आपण चित्रपट गृहात जावून बघायला हवा एवढेच.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!