जऊळका येथील जलजीवन मिशनचे काम थंड बस्त्यात;ग्रामस्थांना करावा लागतोय पाणीटंचाईचा सामना;सरपंच मुंढे यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास निवेदन
लोणार लाईव्ह वृत्त । Lonar Live । सिंदखेड राजा
तालुक्यातील जऊळका येथील jaljivan mition जलजीवन मिशनच्या कामात दिरंगाई होत असल्याने ग्रामस्थांना ऐन मे महिन्यात भीषण panitanchai पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.अतीशय संथगतीने सुरू असलेले हे काम काम त्वरीत सुरू करुन गावात पाणीपुरवठा सुरु करावा अशी मागणी सरपंच गजानन मुंडे यांनी नुकतीच मुख्य कार्यकारी अधीकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सदर काम हे शासकीय कंत्राटदार अनिल सखाराम मात्रे यांना मिळालेले आहे.कंत्राटदारांच्या कामाचा वेग सुरूवातीपासून अतिशय संथगतीने आहे.आता गेल्या एका महिण्यापासून काम पुर्ण पणे बंद आहे.सद्या मे महीना असल्याने गांवामध्ये भिषण पाणी टंचाई भासत असून पाण्याअभावी गांवातील नागरीकांचे प्रचंड हाल होत आहे.काम त्वरीत पूर्ण करण्यासाठी सदर ठेकेदार व सबंधीत अधीकारी यांना वारंवार लेखी व तोंडी विनंती करूनही आतापर्यंत आमच्या मागणीची कोणतीही दखल घेतल्या गेली नाही व सदर काम बंदच ठेवलेले आहे.
त्यामुळे सदर काम हे दि. १५ मे पर्यत पूर्ण करून गावात पाणी न आणल्यास दि.१६ मे रोजी मी गावकऱ्यांसह ग्रा.पं.कार्यालयासमोर आमरण उपोषनास बसणार आहे.त्यामुळे सबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर ठेकेदारावर योग्य ती कार्यवाई करुन दिलेल्या मुदतीत काम पुर्ण करुन गावात पाणीपुरवठा सुरु करावा अशी मागणी सरपंच गजानन मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.