माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने गौरका बिदोरा मोठ्या जल्लोषात साजरा
लोणार लाईव्ह वृत्त : माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने गौरका बिदोरा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.बिंदोरा गजानन महाराज मंदिरापासून मिरवणूक काढून सुरुवात झाली.गजानन मंदिरापासून शैला तोष्णीवाल यांच्या घर,बस स्टँड चौका ते कल्पना सोमाणी यांचे निवासस्थानी आली , यावेळी इसार गौर व सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले, सोबतच या महिलाना शीतपेय देण्यात आले, गणगौरच्या सात दिवसात डॉ. सोनाली मुंदडा यांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
मासिक पाळीच्या समस्येवर, जळल्या वर ताबडतोब घरगुती उपाय कसे करावेत, उन्हाळ्यात पाणी किती प्यावे आणि कसे प्यावे, कॅल्शियम आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मात कशी करावी, उन्हा पासून संरक्षण कसे करावे, असे अनेक विषया वर डॉ.सोनाली मुंदडा यांनी महिला ना मार्गदर्शन करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.अशा प्रकारे लोणारच्या माहेश्वरी महिलांनी वेगवेगळे उपक्रम घेऊन गणगौर उत्सव साजरा केला.हा उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा विद्या केला,शारदा मुंदडा,शैला तोष्णीवाल, सोमाणी, विजया बियाणी, नीता तोष्णीवाल, अंजू काबरा, छाया मानधने, सरला तोष्णीवाल, नेहा कोठारी, आशा मानधने, शीतल तापडिया, गीता तोष्णीवाल आदी महिला यांनी अथक परिश्रम केले.