केक ऐवजी टरबूज कापून जिजाऊच्या लेकीच्या वाढदिवस साजरा
लोणार लाईव्ह वृत्त । पंढरीनाथ डोईफोडे । ०५ एप्रिल २०२४
साखरखेर्डा परिसरातील मुलूखमैदानी तोफ, मंजूळ गायीका, नृत्यांगना, आपल्या प्रगल्भ वाणीतून छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अशा अनेक महात्म्याच्या विचारधारा खेड्यापाड्यात रूजविणारी बालव्याख्यानकार कु. प्रांजली प्रशांत जाधव Pranjali Jadhao हिच्या जन्मदिवसानिमित्ताने केक चा पगडा न करता टरबूज कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
हा खऱ्या अर्थाने बळीराजाचा सन्मान आहे. भारतीय संस्कृती मध्ये संगीत हा जीवनाला तारणारा तराणा आहे भारताला महान गायकांची परंपरा आहे, अभ्यासपूर्ण वाणीतून वक्ते प्रबोधन करतात तेच विचार कच्च्या पिढीवर बिंबवतात असे असताना कच्ची पिढी पक्क्या पिढीला ज्ञानामृत पाजळत असेल तर आम्ही खरंच भाग्यवान आहोत. कारण आम्ही सगळे जिजाऊ, सावित्री, रमाईचे लेकरं आहोत. राष्ट्रमाता जिजाऊंच्या पावन मातीत घडल्याने या मातीतून नक्कीच सोने उगवेल यात शंका नाही यातले प्रांजली हे उदाहरण आहे ह्या चिमुकलीच्या प्रगल्भ वाणीला सलाम वाढदिवसाच्या भक्कम सदिच्छा.