मनाला सांभाळल तर जीवन सुधारेल – डॉ. मुनिश्री पुलकित कुमारजी
लोणार लाईव्ह वृत्त । पंढरीनाथ डोईफोडे । २२ मार्च २०२४
मनावर नियंत्रण ठेवा, जीवन सुधारेल असे डॉ मुनिश्री पुलकितकुमारजी महाराज यांनी सांगितले.मन च पाप आणि पुण्य घडवते.मनच आयुष्याला चांगल्या आणि वाईट मार्गांवर घेऊन जाते.म्हणूनच असे म्हणतात की मन के हारे हार, मन की जीते जीत.मुनी महाराज शुक्रवारी शिक्षक कॉलनी मध्ये प्रवचन देत होते.ते म्हणाले की, मनाच्या शुद्धतेने जीवनाची प्रगती होते.कारण जीवनात मनच भरकटते आणि जीवन भरकटवते.मनावर ताबा मिळविता आला तर सर्व काही ठीक राहते.
आज लोणार येथिल शिक्षक कॉलनी मध्ये Dr.Munishri Pulkit Kumarji व नचिकेता मुनी Aadityakumarji यांचे आगमन झाले व त्यांनी प्रवचन केले.यावेळी सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.आगमनाच्या वेळी कॉलनी मधील सर्व धर्माच्या लोकांनी मुनिश्रींचे जल्लोषात स्वागत केले. कॉलनी मधील वातावरण भक्तीमय झाले. साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा याची प्रचिती आज मुनिश्री आल्यावर आली मुनिश्रींनी प्रवचना मध्ये उत्तम दृष्टांत देऊन प्रवचनाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला, यावेळी मुनिश्री म्हणाले की, येत्या २९ व ३० मे रोजी युगप्रधान , शांतिदूत आचार्य Shri Mahashramanjinche ऐतिहासिक व धार्मिकनगरी लोणार मध्ये आगमन होणार आहे. त्यावेळी सुद्धा सर्व धर्मीय बांधवांनी उपस्थित राहून दर्शनाचा व प्रवचनाचा लाभ घ्यावा.
https://amzn.to/3xfsor3
सुरेशचंद प्रवीणकुमार दुगड परिवाराने कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवलचंद सचिनकुमार गोलेच्छा, रमेशचंद पवनकुमार रुणवाल, कपूरचंद संतोषकुमार रुणवाल, विनोद रुणवाल, भागचंद रुणवाल, या परिवाराने अथक परिश्रम घेतले.