डिजीटल युगात बेरंग झालेला ‘ पळस ‘
पळस
[ पळसाला पाने तीन ]
रंग पळसाचे कालबाह्य झालेत.पळसाचे अस्तित्व राहिले फक्त रानाची शोभा वाढवण्यायेवढे व वसंताच्या अगमनाची चाहुल सांगण्यापुरते त्याचे आयुर्वेदिक औषधी महत्व ही आपल्या द्रृष्टिने केव्हाच संपलेत…
आता साहित्यात, “पळसाला पाने तीन, पळस गेला कोकणात तीन पाने चुकेनात,”या म्हणी आपन सर्रास वापरतो असे का? असा प्रश्न आपनास मुळीच पडतच नाही. कारण आपण डिजीटल झालोत,तसे रंग पंचमीला अनादी काळापासून वापरातील पळसाच्या रंगाचे महत्त्व ही कळेनासे झाले.अंगाला पोषक व शरिरातील विष बाहेर काढणारे पळसाचे रंग आपणास आज नको आहेत.त्याची जागा अंगाचे सालताडे काढणार्या पपक्क्या डिजिटल कलरने घेतली आहे.सणासुदीला,कार्यप्रसंगातील पळसाच्या पत्रावळीची जागा डिजिटल प्लास्टिक व कागदी पत्रावळीने घेतली आहे.राना-वनातील प्रवासात व वनवासात अनादी काळापासून चालत आलेले महत्व आपण का विसरतो आहोत?
साधु संन्याशी पुर्वी कपडे पळसाच्या रंगाने रंगवायचे आता ती ही जागा डिजीटल कलरने घेतली.उघड्या, बोडक्या, रखरखत्या रानात वनात ऊन्हात फिरणार्या लोकांना पळस आपणास ओळखिचा वाटतो…असे का होते? ‘फायर वृक्ष’असे पळसास दिलेले नाव आपनास काय सुचवते हा ही गंभीर प्रश्न आहे?
बंगालमधील भागिरथी नदीच्या काठावर पलासी नावाच्या गावात २३ जून १७५७ रोजी नवाब सिराजुदौला व इंग्रज (इंग्रज आधिकारी रॉबर्टक्लाईव्ह) सैनिक यांच्यात लढाई झाली. ती प्लासीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. कारण पलासी नामक गावात पळसाचे जंगल होते.पळसास हिंदी भाषेत तेसू, ढाक व पलस म्हणतात. संस्कृत मध्ये पलास असे म्हणतात. शास्त्रीय नाव ब्यटीया मोनोस्पर्मा व कुळ फोबेशिया असे आहे. साधारणतः १० ते १४ मीटर वाढणार्या पळसाचे पाने ९ ते २० सेमी व फळे १२ ते २० सेमी आकाराची असतात. पायथ्याने व उतारास पळसाचे जंगल वाढते. भारतात सह्याद्री, वाळवंट, हिमाचल व हिमालय येथे पळसाचे जंगले आढळून येतात. पिवळा व पांढरा पळस वर्धा जिल्ह्य़ातील सीमेवर फुलतो. तुरट, तिखट, कडू, उष्ण गुण व फुले थंड स्निग्ध असतात. फुले पोपोपटाच्या चोचिसारखी भासतात.
पळसात कोरीओपोसीन, सल्फ्युरेन, बट्रीन, ग्लुकोसाईड घटक असतात.आयुर्वेदात त्याचे औषधी गुणधर्म अमाप आहेत.कफनाशक, तेलापासू विविध औषधे, डिंक व वावडिंग/हिंग हे जंत व कृमीजंत तसेच पोटातील आव बाहेर काढण्यासाठी मोलाचे ठरते. फुले, फळे व डिंक यांचा काढा मोडलेली हाडे लवकर जोडण्यात मदत करतात.बियांचा चूर्ण लिबंरसात वापरल्यास खाज, इसब व गजकर्ण यासारखे त्वचा आजार कमी करते. पळसाचा रंग पंचमीस वापरणे याचे कारण म्हणजे रंग त्वचेला सतेज बनवतो. त्वचेतील रंन्ध्रातील विषारी घटक बाहेर काढतो. तसेच मुत्राषय, किडनीचे आजार व त्यावरील सुज यासाठी फुलाचा रस अथवा फुले गरम करुन पोटावर बांधल्यास कमी होते. दम्यावर फुले रात्रभर भिजवून सकाळी गाळून त्यात नमक टाकून प्राशन केल्याने दमा बरा होतो व शौचास साफ होते. भुक ही वाढवते.पुराणात पृथ्वी व सुर्य पुराण कथेत सूर्याने मारलेले बाण म्हणजे पळसाचे पान असा उल्लेख सापडतो. पळसाच्या तीन पानास ब्रम्ह, विष्णू व महेश असा उल्लेख आपण करतो. त्याचा गैरवापर करू नये असे आपले जेष्ठ नेहमी सांगतात. द्रोण,पत्रावळी व पुरण पोळी हा संगम भोजनाची रुचकता वाढवते.आरोग्य वर्धक ठरते.पळसाचे प्रत्येक भाग औषधी गुणधर्मामुळे अनादी कालापासून सर्व परिचित व आवडीचा असावा असे वाटते.आरोग्य वर्धक पळस रोगानूरूप डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरास हरकत नाही, कारण येवढे आयुर्वेदिक गुणधर्म दुसर्या कशात सापडतील असे वाटत नाही.
नयनरम्य वाटणारी फुले जंगलात ज्वालेसम भासतात म्हणूनच त्या झाडाला ‘फ्लेम आँफ फाँरेष्ट’ असे संबोधले गेले असावे.उपयुक्तता व आरोग्यवर्धक गुणधर्म असलेला पळस त्याविषयी थोडे थोडके लिहून भागनार नाही ही बोच अभ्यासात्मक लिखाणास प्रवृत्त करते व कदाचित त्याविषयीच्या आकर्षमानेही मला लिहिण्याचे बळ दिले असावे असे वाटते. पळस हा आयुष्यात प्रतेक कामी प्लस असुनही आपण त्यास मायनस का करत आहोत. हे आपले दुर्भाग्य की नासमज? हे कळणे गरजेचे आहे.
- पुरण पोळी, द्रोण पत्रावळी
- या शिवाय नसायच्या,कोणत्याही सणावळी.
असे मला वाटते. पळसाचे रंग व उलट्या हाताची बोबं आता राहिली नाही.अधुनिकतेने जुन्या जगण्यातील महत्त्व या सर्वाची पायमल्ली, होळी केली आहे.आता उरली आम्हा साहित्यिकापुढे पळसाचे महत्व पटवून देण्याची बोंब…
– – – व्यंकटेश सोळंके
skvsolanke@gmail.com