सामाजिक बांधीलकी जपत 85 वर्षीय आईचा वाढदिवस केला वृद्धाश्रमात साजरा
लोणार लाईव्हवृत्त । पंढरीनाथ डोईफोडे । 2 मार्च २०२४
आई वडील घराला भार न वाटु देता ते कुटुंबाचा आधार असल्याची भावना व्यक्त करत चिखली येथील राजेंद्र कासारे यांनी आपल्या ८५ वर्षीय आईचा वाढदिवस भोकर येथील तुकाराम वृद्धाश्रमात साजरा केला.
तालुक्यातील भोकर येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेल्या वयोवृद्ध आजी आजोबांचे हक्काचे घर असलेल्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे आपली आई शकुंतलाबाई प्रभाकर कासारे माजी मुख्याध्यापिका यांनी वयाचे 85 वर्ष आज पुर्ण केले. आईच्या वाढदिवसा निमित्त वृद्धाश्रमातील वृद्धाच्या सेवे करिता पाच हजार रुपये देणगी व फळ फरसाण वाटप करण्यात आले.
आजच्या कलयुगात आपल्या जन्म दात्याचा सांभाळ करणे तर सोडा पण त्यांची साधी विचारपूस सुद्धा करायला वेळ नाही. लग्न झाले कि एका घराचे दोन दरवाजे होताय, अशा परिस्थितीत ते वयोवृद्ध स्व कष्ट करतात तर काही नाईलाजास्तव वृद्धाश्रमात आश्रय घेतात तर काही आपल्या आई वडील थकले असतील आजारी असतील तर त्यांच्या सेवे करिता कामावर बाई ठेवतात किंवा इतर पर्याय करतात मात्र चिखली चे कासारे कुटुंब हे अपवाद म्हणावे लागेल कारण मुलगा आपल्या आईची पूर्णवेळ सेवा करीत आहे तर सुन ही तलाठी या पदावर नोकरीत असून सुद्धा नोकरीचा गर्व न करता आपल्या सासूबाई वयोवृद्ध असतांना त्यांची आपल्या आई प्रमाणे सर्व जबाबदारी सांभाळून समाजात एक आदर्श निर्माण करीत आहे. आई सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत त्यांना फारपूर्वी पासून समाज सेवेचा छंद होता त्यांचा आदर्श समोर ठेऊन मुलगा राजेंद्र कासारे, सुन संगीताताई कासारे आदित्य कासारे यांनी भोकर येथील तुकाराम आश्रय वृद्धाश्रम येथे आपल्या आई च्या 85 व्या वाढदिवसाच्या निमित्त फळ फरसाण वाटप करून वृद्धाच्या सेवेकरिता पाच हजार रुपये आर्थिक मदत केली. त्यांच्या या कार्यासाठी तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे, संचालिका रुपाली डोंगरदिवे, प्रियांका वानखडे यांच्या सह वृद्धाश्रमातील वृद्ध व सुलोचना महिला आश्रमाच्या महिला यांनी आभार व्यक्त केले आहे.