शालेय पोषण आहार मध्ये शाकाहारी विद्यार्थ्याना अंडी ऐवजी मिळणार केळी तसेच स्थानिक फळ


जैन अल्पसंख्याक महासंघाच्या मागणिला यश

लोणार लाईव्ह वृत्त । मयुर गोलेच्छा । दिनांक – १२ फेब्रू.

शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता यानुसार विद्यार्थ्यांना नियमित आहारा व्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी दिली जाणार होते मात्र शासनाच्या या निर्णयाचा जैन अल्पसंख्यक महासंघच्या वतीने तीव्र निषेध करून विविध शाळेत शिक्षण घेणाऱ्या जैन समाजाच्या विद्यार्थ्यांना मांसाहार करण्यास सरकार प्रवृत्त करत असल्याचे सांगत सरकारने हा निर्णय वापस घेण्याची मागणी जैन अल्पसंख्यक महासंघ च्या वतीने करण्यात आली त्यावरून राज्य सरकारने हा निर्णय वापस घेतला असल्याची माहिती जैन अल्पसंख्यक महासंघचे तसेच भाजप जैन प्रकोष्ठचे प्रदेशअध्यक्ष संदीप भंडारी यांनी दिली आहे .

७ नोव्हेबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले अंडे अथवा अंडा पुलाव,बिर्याणी अशा स्वरूपात आहार देण्याचा निर्णय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला होता.राज्य सरकारच्या यानिर्णया मुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या जैनसमुदायातील विद्यार्थ्यांवर याचा विपरीत परिणाम होऊन ते मांसाहारकड़े आकर्षित होण्याची भीती या निर्णया मुळे जैन समाजात निर्माण झालीहोती त्यामुळे राज्यतील जैन समुदाया च्यावतीने जैन अल्पसंख्यक महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपजी गांधी तसेच प्रदेशअध्यक्ष संदीप भंडारी यांच्या नेतृत्वात शालेय शिक्षणमंत्री दीपककेसरकर यांना कड़धान्य चे पँकिट पँकींग करून पोस्टद्वारे पाठवून या निर्णायचा तीव्र विरोध केला तसेच मध्यान्ह भोजन मधून विद्यार्थ्याना अंडी देण्याचा निर्णयवापस घेण्याची मागणी केली होती.

Advertisement

जैन अल्प संख्यक महासंघच्या वतीने करण्यात आलेल्या मागनिचा फ़ेरविचार करून शालेय शिक्षण विभागाकडून २४ जानेवारी २०२४ रोजी नवीन शासननिर्णय काढून पूर्वीचा निर्णयवापस घेतला आहे. नवीन शासन निर्णया नुसार जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे..हा उपक्रम २३ आठवड्यांकरीता सुरू राहणार आहे. सद्यस्थितीत अंड्याचा बाजारभाव विचारात घेता एका अंड्यासाठी ५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणाऱ्या, आहार शिजवणाऱ्या यंत्रणेमार्फत हा उपक्रम राबविण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

● नागरी भागात केंन्द्रीय स्वयंपाकगृह प्रणाली मार्फ़त तयार आहाराचा पुरिठा महिला बचत गटामार्फ़त करण्यात येतो. नागरी भागातील बचत गटां कडील लाभार्थी संख्या विचारात घेता, ज्या शाळांमधील लाभार्थी विद्यार्थ्यांपैकी ४० टक्के विद्यार्थ्यानी अंडी ऐवजी केळी देण्याची मागणी केल्यास सदर शाळेमधील संपूर्ण निद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत केळी आणि अपवादात्मक परिस्थितित स्थानिक फळ देण्यास अनुमती देण्यात आली आहे.

● केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. या उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने अंड्यांमधील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे यासंदर्भातील शासन निर्णयात म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!