सिंचन तलावाच्या भिंतीवर झाडे-झुडपे वाढली;तडे जाण्याची भीती
सबंधित विभागाला लक्ष देण्याची गरज
लोणार लाईव्ह वृत्त । पंढरीनाथ डोईफोडे
तालुक्यातील येवती येथील सिंचन तलावाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली असून भिंतीला तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषद सिंचन विभागांतर्गत येत असलेल्या या तलावाला याआधी 2013 च्या अतिवृष्टीत मोठे भगदाड पडले होते. त्यानंतर डागडुजीचे काम 2018 मधे पूर्ण झाले.परंतू त्यानंतर या तलावाच्या भींतीवर खूप प्रमाणात झाडा झुडपांची संख्या वाढली आहे. लिंब,पळस,महारीकासारखी मोठाली झाडे येथे वाढली आहेत.याकडे लवकरात लवकर संबंधित विभागाने लक्ष न दिल्यास या भींतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
तरी संबंधित विभागाने ही झाडे झुडपे तोडून भींतीवर साफसफाई करावी अशी मागणी माजी जील्हा परिषद सदस्य भगवानराव सानप व माजी सरपंच नारायण विश्वनाथ कायंदे यांनी केली आहे.