शिवसेनेच्या वतीने श्री राम मंदिर अक्षता वाटप
लोणार/पंढरीनाथ डोईफोडे
मेहकर शहरातील नागरिकांना श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्या येथे येणाऱ्या २२ जानेवारी २०२४ रोजी श्री प्रभू रामचंद्र विराजमान या अभूतपूर्व सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज अक्षता वाटप करण्यात आल्या.
हा सोहळा सर्व हिंदू समाजासाठी सुवर्णक्षण असणार असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण सर्वांनी व्हावे असे खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर म्हणाले.